युवादिन २०१९

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९५ मध्ये सिपना शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झाली. दि १२ जाने २०१९ रोजी दर वर्षी प्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती उत्सव “युवानन्द २०१९” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता स्वामी तन्मयानंदजी,रामकृष्ण विवेकानंद सेवा आश्रम, अंबिकापूर,जि .सुरगुजा,छत्तीसगढ प्रमुख उपस्थिती डाँ. अरविंदजी देशमुख ,श्रीराम महाविद्यालय कुऱ्हा तसेच अनेक मान्यवर यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिठांचे आणि प्रमुख वक्त्यांचे अमोल असे मागदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या कार्यक्रमाला मा. श्री जगदीशभाऊ गुप्ता अध्यक्ष सिपना शिक्षण प्रसारक मंडळ,प्र.प्राचार्य डाँ.अविनाश गावंडे,संचालक मंडळ सिपना व अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुस्तक प्रदर्शनी , विज्ञान प्रदर्शनी ,ग्रामीण खेळ आट्यापाट्या /लंगडीचे आयोजन केले होते.