सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शिवमहोत्सव २०१९ थाटात संपन्न

सिपना अभियांत्रिकी व तंत्रविज्ञान महाविद्यालयात सिपना शिवमहोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले .

सायांस्कोर शाळेच्या प्रांगणातुन रॅलीची सुरवात करण्यात आली . शिव टेकडी गर्ल्स हायस्कुल चौक गणेशदास राठी चौक इरविन ,जयस्तंभ ,राजकमल ,राजापेठ सिपना कॉलेज मार्गाने आली .बुलेटस्वार मुली,झेंडेधारी मावळे ,जिप वर मा. अध्यक्ष श्री. जगदीशभाऊ गुप्ता यांचे सोबत शिवाजी महाराजांच्या वेषात प्रणित खंडेराव शंभाजी प्रवीण बदने ,जिजामाता कु. स्वराली नांदगावकर ,सई बाई कु. प्रणाली भिरड,शिवाजी महाराज देखावा प्रदर्शन भव्य रॅली काढण्यात आली . कॉलेज परिसरात देखावा प्रदर्शन ,घोड्यावर शिवाजी , शंभाजी महाराज सोबत दिपा शाळेचा लेझीम पथक सादरीकरणारे प्रांगणात रॅली पोहोचली . हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चमुने रोप मल्लखांब ,मल्लखांब प्रात्यक्षिक ,अमरावतीच्या विविध शाळेमधील १४ वर्षातील शिवाजी वेशभूषा स्पर्धेत ४० विद्यार्थांनी भाग घेतला . मनीबाई शाळेद्वारे शिवाजी जन्मोत्सव पासुन राज्यभिषेखापर्यंतची जीवनगाथा नाटिका सुद्धा सादर केली. नारायणदास लढ्ढा शाळेच्या विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक सादरीकरण झाले . आदर्श प्राथमिक शाळेचा कु. विदिला संजय पिदडी हिच्या पोवाडा गायनाने प्रेक्षकात उत्साह संचार झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जगदीश भाऊ गुप्ता प्रमुख पाहुने सायबर सेल प्रमुख श्री. कांचन पांडे ,शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख श्री . सुनील खराटे, सोबत संचालक मंडळ सदस्य श्री. मनोज खंडेलवाल , डॉ. रविंद्र कडु ,श्री. निलेश गुप्ता ,प्राचार्य डॉ. अविनाश गावंडे ,संयोजक श्री . अरुण लावणकर , श्री. संदेश कांबळे उपस्तिथ होते . मंच संचालन कु. निशिगंधा साबळे व सोहम बनारसे यांनी केले. बक्षिस वितरण संचालन करण देशमुख ,कु. पूर्णिमा सावरकर हिने केले.