युवादिन २०१८

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९५ मध्ये सिपना शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झाली. दि १२ जाने २०१८ रोजी दर वर्षी प्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती उत्सव “युवानन्द २०१८” म्हणून साजरा  करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता  स्वामी शुध्दिदानंद ,रामकृष्ण मठ कोलकत्ता प्रमुख उपस्थिती मा. आ रवीभाऊ राणा ,तसेच अमरावती जिल्याचे पालकमंत्री मा. आ. प्रवीणभाऊ पोटे  यांची  या उदघाटन सोहळ्याला लाभली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिठांचे  आणि प्रमुख वक्त्यांचे  अमोल असे मागदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या कार्यक्रमाला मा. श्री जगदीशभाऊ गुप्ता व मा. प्राचार्य डाँ .सिद्धार्थ लढके  उपस्थित  होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा व ICONIC FASHION SHOW  चे आयोजन केले होते